शंभुराज देसाई यांनी स्पष्टच म्हटलं… आता हे थांबवा; मनोज जरांगे पाटलांना काय केलं थेट आवाहन?
जरांगे पाटलांकडून सगेसोयरे कायद्याबाबत मागणी होतेय मात्र त्यावर ज्या सूचना हरकती आल्या आहेत, त्यावर कार्यवाही झाली पाहिजे. तसं झालं नाही तर कोर्टात ते आरक्षण कायदा टिकणार नाही आणि मराठा समाजाचेच नुकसान होईल असं असताना पण मनोज जरांगे पाटलांकडून रास्ता रोकोची घोषणा दिली जातेय
मुंबई, २३ फेब्रुवारी २०२४ : राज्य सरकार मराठा आरक्षण प्रश्नी सकारात्मक असताना जनतेला उगाच वेठीस धरू नये, असं आवाहन राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी मनोज जरांगे पाटील यांना केलं. ते पुढे असेही म्हणाले की, जरांगे पाटलांकडून सगेसोयरे कायद्याबाबत मागणी होतेय मात्र त्यावर ज्या सूचना हरकती आल्या आहेत, त्यावर कार्यवाही झाली पाहिजे. तसं झालं नाही तर कोर्टात ते आरक्षण कायदा टिकणार नाही आणि मराठा समाजाचेच नुकसान होईल असं असताना पण मनोज जरांगे पाटलांकडून रास्ता रोकोची घोषणा दिली जातेय. मराठ्यांच्या या आंदोलनामुळे आणि रास्ता रोकोमुळे बारावीचे विद्यार्थी आणि रुग्णांचे हाल होतील, अशी स्पष्टपणे भूमिका मांडत शंभूराज देसाई यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या पुढच्या भूमिकेवर भाष्य केले आहे.
Published on: Feb 23, 2024 04:18 PM
Latest Videos