‘बालिश वक्तव्याकडे आम्ही लक्ष देत नाही’, सामना अग्रलेखावरून कुणाचा संजय राऊत यांच्यावर पलटवार?
VIDEO | सामनातील अग्रलेखातून शिंदे-फडणवीस सरकारवर केलेल्या टीकेला प्रत्युत्तर, कुणाचा संजय राऊत यांच्यावर हल्लाबोल
सातारा : सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील सत्तासंघर्षावर निर्णय दिला आहे. या निर्णयाचा सत्ताधारी आणि विरोधक आपल्या सोयीचा अर्थ काढून आनंदोत्सव साजरा करत आहेत. या निर्णावरून ‘सामना’च्या अग्रलेखातून राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयावर आणि सामनातील अग्रलेखातून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलेल्या टीकेवर शिवसेनेतील नेते आणि मंत्री शंभुराज देसाई यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, ‘सामनातील अग्रलेख लिहिणाऱ्या एकट्या व्यक्तीला कायदा कळतो, असा त्यांचा समज आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना संजय राऊत यांनी अल्टिमेटम दिला. जो अल्टिमेटम सर्वोच्च न्यायालयाने देखील दिला नाही. न्यायालयाने दिलेल्या निकालाचा आदर न करता आम्ही करू तिच पूर्व दिशा…सामना अग्रलेख लिहिणारे सर्वोच्च न्यायालयाच्याही वर असल्याचे स्वतःला समजून घेत आहेत. त्यामुळे अशा बालिश वक्तव्याकडे आम्ही लक्ष देत नाही’, असे म्हणत शंभुराज देसाई यांनी संजय राऊत यांच्यावर खोचक टीका केली.