'त्या' नैतिकतेचं उत्तर द्या, मग आम्हाला धडे शिकवा; कुणी उद्धव ठाकरे यांना फटकारलं

‘त्या’ नैतिकतेचं उत्तर द्या, मग आम्हाला धडे शिकवा; कुणी उद्धव ठाकरे यांना फटकारलं

| Updated on: May 13, 2023 | 12:59 PM

VIDEO | 2019 ला कुठे गेली होती तुमची नैतिकता, आधी त्याचं उत्तर द्या मग..., उद्धव ठाकरे यांच्यावर कुणी केला हल्लाबोल?

सातारा : सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावरील निकालानंतर उद्धव ठाकरे यांनी म्हटले की, मी नैतिकतेच्या आधारे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा राज्यपालांकडे सोपवला. यानंतर ते म्हणाले सर्वोच्च न्यायायाने लक्तरं काढल्यानंतर तरी एकनाथ शिंदे यांनी राजीनामा द्यावा, अशी आक्रमक मागणीही केली. यावर शिवसेनेचे नेते आणि पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, ‘उद्धव ठाकरे यांना ज्या सल्लागाराने मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यायला सांगितला. त्याच्याकडून या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर देखील सल्ला घ्या. त्यानंतर तुम्हाला त्याचा अर्थ कळेल. २०१९ साली कुठे गेली होती नैतिकता?’ असा सवालही शंभुराज देसाई यांनी केला. तर ते पुढे म्हणाले, मी त्यावेळचा आमदार आहे मी आग्रह केला ज्यांच्यासह युती केली त्यांच्यासोबत सरकार स्थापन करूया आपण ज्यांच्या विरोधात लढलो त्यांच्यासोबत सरकार स्थापन करणं ही प्रतारणा आहे. त्यावेळी कुठे गेली होती नैतिकता याचे उत्तर उद्धव ठाकरे यांनी द्यावे मग आम्हाला नैतिकतेचे धडे शिकवावेत, असे म्हणत खोचक टोलाही त्यांनी लगावला आहे.

Published on: May 13, 2023 12:59 PM