एकेकाळी ज्यांचा दरारा होता त्यांनी स्वतःहून अशी अवस्था केलीय, कुणी व्यक्त केली खंत?

एकेकाळी ज्यांचा दरारा होता त्यांनी स्वतःहून अशी अवस्था केलीय, कुणी व्यक्त केली खंत?

| Updated on: May 21, 2023 | 10:57 PM

VIDEO | महाविकास आघाडी टिकेल अशी कुठलीही चिन्हं दिसत नाहीत, शिवसेनेच्या नेत्यानं थेट कारणांचा वाचला पाढा

पुणे : महाविकास आघाडीमध्ये छोटा भाऊ, मोठा भाऊ हे होणारच होतं. ज्यावेळी आमचे 56 आमदार होते त्यावेळी महाविकास आघाडीमधला एक नंबरचा पक्ष होता. मात्र आमची ताकद काय आहे हे महाविकास आघाडीतल्या घटक पक्षांना माहिती होतं. त्यामुळेच 56 वरून आमदारांची संख्या आता 15 वर आली आहे आणि त्यांचा दर्जा लहान भावावर घसरला असल्याचे सांगत आता हे वाद रोज होणार आहेत अशी शक्यता राज्य उत्पादक शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी व्यक्त केली आहे. हा वाद कधी ना कधी होणारच होता. त्यामुळे मला यात काही विशेष वाटत नाही असा टोलाही त्यांनी त्यांना लगावला आहे. त्यांच्या या वादामुळेच महाविकास आघाडी टिकेल अशी कुठलीही चिन्हं आता दिसत नाहीत, कुठल्या छोट्या नेत्याने वक्तव्य करणं ते वेगळं होतं मात्र शरद पवारानंतर आता अजित पवार यांच्याकडूनही तेच वक्तव्य केले जात असेल तर कठीण आहे असा टोलाही त्यांनी त्यांना लगावला आहे. एकेकाळी जे आमचे नेते होते त्यांचा दरारा होता ज्या मातोश्रीचा दरारा सगळ्या देशात होता त्यांनी स्वतःच्या हाताने स्वतःची काय अवस्था करून घेतली हे बघताना मला खंत वाटते असं मतही त्यांनी ठाकरे गटाविषयी व्यक्त केले आहे.

Published on: May 21, 2023 10:57 PM