किरीट सोमय्या यांच्या कोल्हापूर जाण्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो : गृहराज्यमंत्री
किरीट सोमय्या यांच्या कोल्हापुरात जाण्याने त्यांच्या सुरक्षेसह कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना जिल्ह्यात येण्यास मनाई केली आहे. कायद्यामध्ये ज्या तरतूदी आहेत, जिल्हाधिकाऱ्यांना जे अधिकार प्राप्त आहेत त्या अधिकाऱ्यांनुसार मनाईचे आदेश दिले आहेत", अशी प्रतिक्रिया राज्याचे गृराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली आहे.
“भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांना कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी कोल्हापूर जिल्ह्यात येण्यास मनाई करण्याचे आदेश दिले आहेत. सोमय्या वारंवार वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या नेते आणि मंत्र्यांवर आरोप करत असतात. त्यांच्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू शकतो. याशिवाय गणेशोत्सव सुरु आहे. पोलीस गणेशोत्सवाच्या बंदोबस्तात आहेत. त्यांच्यावर ताण आहे. सोमय्या यांना केंद्र सरकारने सुरक्षा दिली आहे. त्यांच्या कोल्हापुरात जाण्याने त्यांच्या सुरक्षेसह कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना जिल्ह्यात येण्यास मनाई केली आहे. कायद्यामध्ये ज्या तरतूदी आहेत, जिल्हाधिकाऱ्यांना जे अधिकार प्राप्त आहेत त्या अधिकाऱ्यांनुसार मनाईचे आदेश दिले आहेत”, अशी प्रतिक्रिया राज्याचे गृराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली आहे.