Uday Samant Video : मुंबईकरांसाठी मोठी बातमी, BMC क्षेत्रातील होर्डिंग्स संदर्भात मंत्री उदय सामंतांची विधानसभेत घोषणा, म्हणाले, 3 महिन्यात…
शिवसेनेचे नेते, मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत मोठी घोषणा केली आहे. ही घोषणा मुंबईतील अनधिकृत होर्डिंग्स आणि बॅनर्ससंदर्भात असून मुंबईकरांसाठी महत्त्वाची आहे.
मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. मुंबईत अनधिकृत होर्डिंग्स आणि बॅनर लावणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे. सध्या मुंबईतील विधानभवनात अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असून या अधिवेशनात मुंबईतील अनधिकृत होर्डिंग्स आणि बॅनर्सचा मुद्दा चांगलाच गाजतोय. बऱ्याच भारतीय जनता पक्षाच्या आमदारांनी मुंबईतील अनधिकृत होर्डिंग्स आणि बॅनर्सचा मुद्दा सभागृहात उपस्थित केला होता. यानंतर अनधिकृत होर्डिंग्स आणि बॅनर्स लावणाऱ्यांवर योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली जात असताना शिवसेनेचे नेते, मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत मोठी घोषणा केल्याचे पाहायला मिळाले. BMC क्षेत्रातील सर्वच होर्डिंग्सचं 3 महिन्यात ऑडिट करण्यात येणार आहे. BMC क्षेत्रातील होर्डिंग्स संदर्भात उदय सामंत यांनी विधानसभेत मोठी घोषणा केली. तर पुढील अधिवेशनापर्यंत सविस्तर अहवाल सादर करणार असल्याची माहिती देखील मंत्री उदय सामंत यांनी दिली. तर अनधिकृत होर्डिंग्स संदर्भातील ठेकेदारांवर देखील गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचेही मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.

IPL बघणं महागात पडलं; एसटी प्रशासनाने चालकाला थेट बडतर्फच केलं

'.. तर गावबंदी करू', मल्हार सर्टिफिकेटला जेजूरीच्या ग्रामस्थांचा विरोध

'मला शरद पवारांनी मंत्री केलं..', खतगावकरांचं अजितदादांसमोरच विधान

'तो आमचा विठ्ठल..' धाराशीवात खोक्याच्या समर्थनार्थ आदिवासी समाज एकवटला
