शिंदेंची मध्यरात्री नाराज दिनकर पाटलांशी भेट, बंद दाराआड चर्चा, उदय सामंतांनी सांगितलं भेटीचं कारण
एकनाथ शिंदे यांनी मध्यरात्री दिनकर पाटील यांची भेट घेतली. नाशिकमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दिनकर पाटील यांच्यात बंद दाराआड चर्चा झाली. महायुतीकडून तिकीट न मिळाल्याने दिनकर पाटील नाराज असल्याच्या चर्चा होत्या. तर नाशिकची जागा भाजपला मिळावी यासाठी आग्रह धरला होता.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मध्यरात्री दिनकर पाटील यांची भेट घेतली. नाशिकमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दिनकर पाटील यांच्यात बंद दाराआड चर्चा झाली. महायुतीकडून तिकीट न मिळाल्याने दिनकर पाटील नाराज असल्याच्या चर्चा होत्या. तर नाशिकची जागा भाजपला मिळावी यासाठी आग्रह धरला होता. पण आता पाचव्या टप्प्यात नाशिक येथे २० मे ला मतदान होणार आहे. यापार्श्वभूमीवर सावध पवित्रा म्हणून दिनकर पाटलांची भेट घेतली. तरी ही भेट नेमकी का झाली याचं कारणही मंत्री उदय सामंत यांनी सांगितलं. ते म्हणाले, काल संध्याकाळी दिनकर पाटील यांच्या घरी चहापानासाठी मुख्यमंत्री भेटणार होते. मात्र कार्य बाहुल्यामुळे मुख्यमंत्र्यांना दिनकर पाटील यांच्या घरी जाता आलं नाही, असे उदय सामंत यांनी सांगितले तर या आधीचे नेते सात वाजताच निघून जायचे मात्र मुख्यमंत्री संवेदनशील असल्याने दिनकर पाटील यांना वाईट वाटू नये, यासाठी रात्री दिनकर पाटील यांच्या घरी जाऊन मुख्यमंत्र्यांनी त्यांची भेट घेतली असल्याचे सामंत म्हणाले.