ठाकरे गटातील खासदार कलाबेन डेलकर भाजपमध्ये जाणार? उदय सामंत म्हणाले, कोण शिल्लक…
लोकसभा निवडणुका काही महिन्यांवर असताना ठाकरे गटाचा एक खासदार पक्षाला सोडचिठ्ठी देणार असल्याची चर्चा होतेय. कलाबेन डेलकर यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली तर त्यांच्या जाण्याने ठाकरे गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. यावर शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे उद्योग मंत्री यांनी याविषयावर भाष्य केले आहे.
पुणे, २३ डिसेंबर २०२३ : लोकसभा निवडणुका काही महिन्यांवर असताना ठाकरे गटाचा एक खासदार पक्षाला सोडचिठ्ठी देणार असल्याची चर्चा होतेय. ठाकरे गटातील खासदार कलाबेन डेलकर भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा होतेय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी झालेली भेट अत्यंत सकारात्मक झाली. मात्र डेलकर कुटुंब कार्यकर्त्यांशी संवाद साधून अंतिम निर्णय घेणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे जर कलाबेन डेलकर यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली तर त्यांच्या जाण्याने ठाकरे गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. यावर शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे उद्योग मंत्री यांनी याविषयावर भाष्य केले आहे. ‘कोणच शिल्लक राहणार नाहीत. सगळेच सगळीकडे जाणार आहेत.’, असे म्हणत उदय सामंत यांनी ठाकरे गटातील खासदार कलाबेन डेलकर भाजपमध्ये जाण्याच्या चर्चांवर प्रतिक्रिया दिली आहे.
Published on: Dec 23, 2023 03:58 PM
Latest Videos