उदय सामंत आणि 'या' राष्ट्रवादीच्या माजी आमदाराची बंद दारआड चर्चा, भेटीमागचं कारण काय?

उदय सामंत आणि ‘या’ राष्ट्रवादीच्या माजी आमदाराची बंद दारआड चर्चा, भेटीमागचं कारण काय?

| Updated on: May 24, 2023 | 8:37 AM

VIDEO | चिपळूणची राजकीय समीकरणे बदलणार? उदय सामंत 'या' राष्ट्रवादीच्या माजी आमदाराच्या भेटीला

रत्नागिरी : पालक मंत्री उदय सामंत यांनी राष्ट्रवादीचे माजी आमदार रमेश कदम यांच्या निवासस्थनी जाऊन भेट घेतली आणि बंद दारआड जवळपास २० मिनिटे चर्चा केली. त्यानंतर प्रसार माध्यमांशी सवांद साधला. यावेळी माजी रमेश कदम हे राजकारणातील मार्गदर्शक असून ज्या ज्या वेळी माझ्यावर कटू प्रसंग आले त्या त्यावेळी त्यांचे मार्गदर्शन घेतले आहे. आज त्यांची सदिच्छा भेट घेऊन लवकरच त्यांनी शिवसेनेत आम्हाला मार्गदर्शन करावे, असे त्यांना सांगितले आहे. त्याचा ते विचार लवकरात लवकर करतील, अशी आशा आहे. पालक मंत्री उदय सामंत आणि राष्ट्रवादीचे माजी आमदार रमेश कदम यांच्या भेटीने राजकीय चर्चेला उधाण आले आहे. मात्र यावर माजी आमदार रमेश कदम यांनी उतर देणे टाळले असेल तरी येत्या काही दिवसात चिपळूणची राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता राजकीय वर्तुळातून व्यक्त होत आहे..

Published on: May 24, 2023 08:37 AM