मुंबईत मराठीच नो अलाऊड कसे? मंत्री उदय सामंत यांनी घेतली तृप्ती देवरूखकर यांची भेट अन् म्हणाले...

मुंबईत मराठीच नो अलाऊड कसे? मंत्री उदय सामंत यांनी घेतली तृप्ती देवरूखकर यांची भेट अन् म्हणाले…

| Updated on: Sep 29, 2023 | 12:32 PM

VIDEO | मुलुंड येथील सोसायटीमध्ये ऑफीससाठी जागा बघायला गेलेल्या मराठी महिलेला नकार... मंत्री उदय सामंत यांनी तृप्ती देवरूखकर यांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली. यावेळी उदय सामंत यांनी सरकार तुमच्या पाठिशी असल्याचे म्हणत तृप्ती देवरूखकर यांना पाठिंबा दर्शविला.

मुंबई, २९ सप्टेंबर २०२३ | मुलुंड येथील सोसायटीमध्ये ऑफिससाठी जागा बघायला गेलेल्या मराठी महिलेला नकार देण्यात आल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, घडलेल्या या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे. या महिलेला केवळ ती मराठी असल्याने ऑफिस नाकारण्यात आल्याने राजकीय वर्तुळातूनही प्रतिक्रिया उमटताना दिसत आहे. अशातच मंत्री उदय सामंत यांनी तृप्ती देवरूखकर यांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली. यावेळी उदय सामंत यांनी सरकार तुमच्या पाठिशी असल्याचे म्हणत त्यांना पाठिंबा दर्शविला. तृप्ती देवरूखकर यांना याप्रकरणानंतर त्यांच्या भावना सहन झाल्या नाही त्यांनी व्हिडीओ करून तो शेअर केला. यावर उदय सामंत म्हणाले, ‘तुम्ही जे केले ते चुकीचे नाही, त्यामुळे सगळयांना कळाले की अशी प्रवृत्ती आहे. असे प्रसंग वारंवार घडणं योग्य नाही. आम्ही सोबत आहोत.’, असे उदय सामंत म्हणाले.

Published on: Sep 29, 2023 12:30 PM