उदय सामंत यांनी मनोज जरांगे पाटील यांना स्पष्टच सांगितलं; म्हणाले, मनात आलं म्हणजे…
मनात आलं म्हणजे विशेष अधिवेशन घेता येत नाही, असे म्हणत मंत्री उदय सामंत यांनी विशेष अधिवशेनावर प्रतिक्रिया दिली आहे. मंत्रिमंडळात झालेल्या निर्णयानुसार येत्या २० फेब्रुवारीला अधिवेशन होणार असल्याचे म्हणत मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीवर उदय सामंत यांचं भाष्य
कोल्हापूर, १५ फेब्रुवारी २०२४ : मनात आलं म्हणजे विशेष अधिवेशन घेता येत नाही, असे म्हणत मंत्री उदय सामंत यांनी विशेष अधिवशेनावर प्रतिक्रिया दिली आहे. मंत्रिमंडळात झालेल्या निर्णयानुसार येत्या २० फेब्रुवारीला अधिवेशन होणार असल्याचे म्हणत मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीवर उदय सामंत यांनी भाष्य केले आहे. ते असेही म्हणाले की, मराठा आरक्षणासाठी २० फेब्रुवारी रोजी विशेष अधिवेशन घेणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं होतं. तर उद्या अधिवेशन घेऊया…असं अधिवशन होत नाही. विशेष अधिवेश हे मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे होणार आहे. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी स्वतःच्या प्रकृतीची काळजी घेतली पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केले. तर उपोषण केल्यानं चिडचिड होते. त्यातून भावना व्यक्त करताना सरकारवर टीका केली असेल त्यावर आम्ही नाराज आहोत असे अजिबात नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.