फडणवीस यांनी टिकणारं मराठा आरक्षण दिलं होतं पणं…, उदय सामंत यांचा रोख नेमका कुणावर?
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी मराठ्यांना पहिलं टिकणारं मराठा आरक्षण दिलं होतं असे सांगत असताना मराठा आरक्षण नेमकं कुणामुळे गेलं हे पाप कुणाचं काही लोकांनी त्याचा अभ्यास करावा, असं वक्तव्य करत उदय सामंत यांचा मनोज जरांगे पाटील यांचं नाव न घेता सल्ला
रत्नागिरी, १० डिसेंबर २०२३ : गैरसमजातून कुठलंही वक्तव्य होऊ नये, अशी प्रामाणिक भावना असल्याचे शिंदे सरकारमधील मंत्री उदय सामंत यांनी म्हटले आहे. तर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी मराठ्यांना पहिलं टिकणारं मराठा आरक्षण दिलं होतं असे सांगत असताना मराठा आरक्षण नेमकं कुणामुळे गेलं हे पाप कुणाचं काही लोकांनी त्याचा अभ्यास करावा, असं वक्तव्य करत उदय सामंत यांनी मनोज जरांगे पाटील यांचं नाव न घेता त्यांना सल्ला दिला. मराठा समाजाला टिकणारं पहिलं आरक्षण हे देवेंद्र फडणवीस यांनी दिलं होतं. ते हायकोर्टातही टिकलं होतं. फडणवीस सरकार जाण्यापूर्वी एक वर्ष ते सुप्रीम कोर्टातही टिकलं होतं. देवेंद्र फडणवीस यांनी दिलेलं मराठा आरक्षण नंतर टिकू शकलं नाही. ते का टिकू शकलं नाही, याचा अभ्यास होणं गरजेचं आहे. त्याचा अभ्यास काही लोकांनी केला पाहिजे, असं म्हणत अप्रत्यक्षपणे उदय सामंत यांनी जरांगे पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे. तर उगाच गैरसमजातून एखाद्याला टार्गेट करणं हे योग्य नाही, असेही सामंत म्हणाले.