मंत्रिपदासाठी जोरदार लॉबिंग, भाजपसह शिंदे अन् अजितदादांच्या वाट्याला किती मंत्रीपदं? कोण-कोण होणार मंत्री?
विधानसभेच्या निकालानंतर महायुतीकडे २३० आमदारांचं संख्याबळ आलंय. आत तिनही पक्षाच्या आमदारांची संख्या वाढलेली आहे. त्यामुळे मंत्रिपदासाठी जोरदार लॉबिंग सुरू असून जोरदार स्पर्धा सुरू झाली आहे.
विधानसभेच्या निकालानंतर महायुतीकडे २३० आमदारांचं संख्याबळ आलंय. आत तिनही पक्षाच्या आमदारांची संख्या वाढलेली आहे. त्यामुळे मंत्रिपदासाठी जोरदार लॉबिंग सुरू असून जोरदार स्पर्धा सुरू झाली आहे. महायुतीच्या मोठ्या विजयानंतर भाजप, अजित पवार यांची राष्ट्रवादी आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत अंतर्गत लॉबिंग सुरू झाली आहे. विधानसभेचं संख्याबळ हे २८८ इतकं आहे. त्यात १५ टक्के मंत्रीपदाची संख्या असते. त्यामुळे राज्यात ४३ जण मंत्री होऊ शकतात. त्यात ३३ कॅबिनेट मंत्री तर १० राज्यमंत्री होऊ शकतात. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पाच ते सहा आमदारांमागे एक मंत्रिपद असा फॉर्म्युला ठरला आहे. जर भाजपचे १३२ आमदार निवडून आल्याने भाजपचा सर्वाधिक वाटा असू शकतो. म्हणून भाजपचे २२ ते २४ मंत्री असू शकतात. शिंदेंच्या शिवसेनेचे ५७ आमदार आहेत. त्यामुळे त्यांचे १२ ते १३ मंत्री होऊ शकतात. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे ४१ आमदार आहेत त्यामुळे ९ ते १० मंत्रिपद त्यांच्या वाट्याला येऊ शकतात. दरम्यान, भाजपमध्ये देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बानवकुळे, गिरीश महाजन, सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील, आशिष शेलार हे कॅबिनेट मंत्री होऊ शकतात. यासोबत प्रवीण दरेकर, रवींद्र चव्हाण, राहुल कुल, मंगलप्रभात लोढा, संभाजी निलंगेकर आणि गणेश नाईक हे ही शर्यतीत आहेत. तर राज्यमंत्री कोण होऊ शकतात? बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट