लोकसभेच्या जागावाटपावरुन शिंदेंचे मंत्री आक्रमक! शिवसेनेला आणखी किती जागा?

लोकसभेच्या जागावाटपावरुन शिंदेंचे मंत्री आक्रमक! शिवसेनेला आणखी किती जागा?

| Updated on: Apr 07, 2024 | 11:58 AM

वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीत ठाणे, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, पालघर आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग या जागा सोडू नका, अशी मागणी शिंदेंच्या मंत्र्यांनी केली. आपल्या जागा सोडू नका, यावर मंत्री आणि आमदारांनी मुख्यमंत्र्यांसमोर आक्रमक भूमिका घेतली. एक मोठा नेता आणि अनेक आमदार संपर्कात असल्याची चर्चाही बैठकीत झाली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीत जागावाटपावरून शिंदेंचे मंत्री आणि आमदार आक्रमक झाल्याचे कळतेय. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ठाणे, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, पालघर आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग या जागा सोडू नका, अशी मागणी शिंदेंच्या मंत्र्यांनी केली. आपल्या जागा सोडू नका, यावर मंत्री आणि आमदारांनी मुख्यमंत्र्यांसमोर आक्रमक भूमिका घेतली. आपलेच मतदारसंघ कसे जात आहे, मित्रपक्षांचे मतदारसंघ आपल्याला मिळावेत, अशी मंत्र्यांची रोखठोक भूमिका आहे. तसेच संजय निरूपम यांना पक्षात घेण्यावरून एकमत झालं असून ४८ तासांत त्यांचा पक्षप्रवेश होईल. एक मोठा नेता आणि अनेक आमदार संपर्कात असल्याची चर्चाही बैठकीत झाली. शिंदेच्या शिवसेनेकडून अद्याप १० उमेदवारांच्या नावांची घोषणा झाली. त्यापैकी ३ विद्यमान खासदारांचा पत्ता कट झालाय. आणखी ३-४ जागा शिंदेंना मिळण्याची शक्यता आहे. त्यावरून बैठकीनंतर संजय शिरसाट यांनी भाष्य केले आहे. दरम्यान, भाजप मोठ्या भावाच्या भूमिकेत असल्याचे त्यांनी म्हटलंय. बघा स्पेशल रिपोर्ट

Published on: Apr 07, 2024 11:58 AM