Special Report | EDचे आकडे? महाराष्ट्रात टार्गेटवर 'ठाकरे'?-tv9

Special Report | EDचे आकडे? महाराष्ट्रात टार्गेटवर ‘ठाकरे’?-tv9

| Updated on: Mar 23, 2022 | 9:22 PM

ठाकरे परिवाराचं हे पहिलंच मनी लॉन्ड्रिंगचं काम आहे की, या आधीही अशी कामं केलीयत, असा तिखट सवाल बुधवारी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी करत शिवसेनेवर पुन्हा एकदा हल्लाबोल केलाय. ते मुंबईत बोलत होते. ईडी अर्थातच अंमलबजावणी संचलनालयाने मंगळवारी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मेहुण्यावर कारवाई केली.

मुंबईः ठाकरे परिवाराचं हे पहिलंच मनी लॉन्ड्रिंगचं काम आहे की, या आधीही अशी कामं केलीयत, असा तिखट सवाल बुधवारी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी करत शिवसेनेवर पुन्हा एकदा हल्लाबोल केलाय. ते मुंबईत बोलत होते. ईडी अर्थातच अंमलबजावणी संचलनालयाने मंगळवारी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मेहुण्यावर कारवाई केली. उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्या ठाण्यातील 11 सदनिका जप्त केल्या. या मालमत्तांची किंमत 6 कोटी 45 लाख रुपये असल्याचे ईडीने सांगितले. ईडीने पुष्पक ग्रुपच्या कंपन्यांपैकी एक असलेल्या मेसर्स पुष्पक बुलियनशी संबंधित स्थावर मालमत्ता जप्त केलीय. यात साईबाबा गृहनिर्मिती प्रायव्हेट लिमिटेडच्या ठाण्यातील नीलांबरी प्रकल्पातील सदनिकांचा समावेश आहे. ईडीच्या या कारवाईनंतर आता भाजप विरुद्ध शिवेसना असा कलगीतुरा पुन्हा एकदा रंगलाय.