देव तारी त्याला कोण मारी, अंत्यविधीची तयारी सुरू अन् ‘तो’ जिवंत झाला; कुठं घडली सिनेमात शोभेल अशी घटना?
डॉक्टरांनी हृदयविकाराच्या झटक्यामुळे त्यांना मृत घोषित केले होते. परंतु, रुग्णालयातून घरी नेताना रुग्णवाहिकेला बसलेल्या धक्क्यामुळे रुग्णाच्या शरीराची हालचाल जाणवली.
हृदयविकाराचा झटका आल्याने डॉक्टरांनी या रुग्णाला मृत घोषित केलं होतं. रुग्णालयातून वृद्ध रुग्णाला घरी आणताना शरीराची हालचाल जाणवली आणि रुग्णालयातून पांडुरंग उलपे यांना घरी येऊन जात असताना रस्त्यावरच्या खड्ड्यामुळे रुग्णवाहिकेला धक्का बसला. यानंतर वृद्ध रुग्णाच्या शरीराची हालचाल झाल्याने त्यांचा पुनर्जन्म झाला. वृद्ध रुग्ण पांडुरंग उलपे चालत घरी परतले. कोल्हापूरच्या कसबा बावडा परिसरात राहणारे, वारकरी संप्रदायातील पांडुरंग तात्या म्हणजेच पांडुरंग उलपे, हे 15 दिवसांपूर्वी हरिनामाचा जप करत बसले होते, मात्र तेव्हाच त्यांना हृदयविकाराचा झटका आला. यानंतर त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी हृदयविकाराच्या झटक्यामुळे त्यांना मृत घोषित केले होते. परंतु, रुग्णालयातून घरी नेताना रुग्णवाहिकेला बसलेल्या धक्क्यामुळे रुग्णाच्या शरीराची हालचाल जाणवली. त्यानंतर रुग्णाला पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. आता पांडुरंग उलपे नावाचे हे वृद्ध रुग्ण स्वतःच्या पायावर चालत घरी परतले आहेत. ही घटना कोल्हापुरात घडली आहे. या घटनेनंतर सर्वांनाच आनंद झाला असून आश्चर्याचा धक्काही बसला. या वृद्ध व्यक्तीला मृत घोषित केल्यानंतर घरात अंत्यविधीची तयारी सुरू असताना तो माणूसच जिवंत झाला, हालचाल करू लागला, एवढंच नव्हे तर स्वत:च्या पायानेच चालत घरी आला. एखाद्या सिनेमामध्ये शोभेल अशी घटनाच कोल्हापुरात घडली. सध्या या घटनेची चर्चा होतेय.