‘एकनाथ शिंदेंनी माझा घात केला नाहीतर…’, 4 दिवस बेपत्ता असलेले श्रीनिवास वगना नेमकं काय म्हणाले?
आमदार श्रीनिवास वनगा चार दिवसानंतर घरी परतले. बेपत्ता होते. उमेदवारी नाकारल्यानंतर अज्ञातस्थळी गेले होते. त्यांना शिंदे गटाने पालघरमधून उमेदवारी नाकारली होती. चार दिवस बेपत्ता राहिल्यानंतर ते घरी परतले. कुठे होते माहीत नव्हतं. पण काल त्यांनी घरच्यांशी संपर्क केला होता. नातेवाईकांकडे असल्याचं त्यांनी सांगितलं होतं.
बेपत्ता असलेले शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार श्रीनिवास वनगा हे चार दिवसानंतर घरी परतले. विधानसभेचं तिकीट नाकारल्याने नाराज होऊन 36 तासांपासून अज्ञातवासात असलेल्या श्रीनिवास वनगा यांनी घरी परतल्यानंतर ‘टीव्ही ९ मराठी’ला आपली प्रतिक्रिया दिली. ‘शिंदेंनी घात केला नाही. साहेबांना मिस गाईड करणाऱ्यांनी घात केला. माझ्याबद्दल साहेबांना मिस गाईड केलं. मी ठाकरे गटाच्या संपर्कात नाही. मी फक्त एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात आहे. मी आश्वासनावर राहणार नाही. मला जे काम दिलं ते करेल. आमचं घराणं महायुतीत आहे. मी अजूनही कोणत्याही पक्षाचं काम करू शकत नाही. मी निष्ठावंत आहे. भाजप आणि शिवसेना व्यतिरिक्त मी काम करू शकत नाही. आता तरी उद्धव ठाकरे यांना भेटण्याची इच्छा नाही. उद्धव ठाकरे व्यक्ती चांगले आहेत. खूप चांगले आहेत. हे मान्य करतो. पण या परिस्थिती त्यांना भेटायला जाण्याच्या मनस्थितीत नाही’, असे श्रीनिवास वनगा म्हणालेत. पुढे त्यांनी असेही म्हटले, अडीच वर्षात त्यावेळी खरंच काही काम होत नव्हतं. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात मी मतदारसंघात १२०० कोटींचा निधी आणला. शिंदे यांनी मला भरपूर काही केलं. उद्धव ठाकरेंनी दिलं. मी सूरत गुवाहाटीला गेलो. एकटाच नाही. सर्व होतो. मी डान्स केला नाही. मी माझ्या रुममध्ये होतो, असे श्रीनिवास वनगा म्हणाले.