पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवरील 'मिसिंग लिंक'वरून लवकरच करता येणार प्रवास, कधी होणार खुला?

पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवरील ‘मिसिंग लिंक’वरून लवकरच करता येणार प्रवास, कधी होणार खुला?

| Updated on: Jun 25, 2024 | 2:25 PM

मुंबई-पुणे मिसिंग लिंक प्रकल्प हा दोन शहरांमधील कनेक्टिव्हिटी वाढविण्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. त्याचं काम पूर्ण होण्याची अंतिम मुदत आता मार्च 2025 पर्यंत वाढविण्यात आली आहे, मात्र हा मिसिंग लिंक पूर्णत्वाच्या जवळ आहे. 2025 मध्ये पूर्ण झाल्यानंतर या दोन गजबजलेल्या शहरांमधील प्रवासाचे अंतर कमी करण्यासाठी याचा उपयोग होणार आहे.

पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेवरील डिसेंबर महिन्यात सुरु होणारा मिसिंग लिंक प्रकल्प मार्च 2025 ला खुला होणार आहे. मुंबई-पुणे मिसिंग लिंक प्रकल्प हा दोन शहरांमधील कनेक्टिव्हिटी वाढविण्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. त्याचं काम पूर्ण होण्याची अंतिम मुदत आता मार्च 2025 पर्यंत वाढविण्यात आली आहे, मात्र हा मिसिंग लिंक पूर्णत्वाच्या जवळ आहे. एकूण 14 किलोमीटर असणाऱ्या या मिसिंग लिंकच्या खंडाळा येथील केबल स्टेड पुलाचे अवघे 900 मीटर अंतर पूर्ण होणे बाकी आहे. त्यामुळे डिसेंबर 2024 ला नागरिकांच्या सेवेत येणाऱ्या हा मिसिंग लिंक मार्च 2025 ला खुला होणार असल्याची माहिती मिळतेय. खंडाळा खोऱ्यात सुमारे 180 मीटर उंच केबल-स्टेड पुलाच्या बांधकामाला पावसाळ्यामुळे अडचणी निर्माण होत आहेत. 2025 मध्ये पूर्ण झाल्यानंतर या दोन गजबजलेल्या शहरांमधील प्रवासाचे अंतर कमी करण्यासाठी याचा उपयोग होणार आहे.

Published on: Jun 25, 2024 02:25 PM