मुंबई महापालिकेसाठी महायुतीचं मिशन 151 पण भाजपचे येणार फक्त 28 नगरसेवक?
VIDEO | भाजपच्या सर्व्हेनुसार मुंबई महापालिकेसाठी फक्त 28 जागा ? बघा स्पेशल रिपोर्ट
मुंबई : मुंबई महापालिका जिंकण्यासाठी भाजपनं मिशन १५१ ची तयारी सुरू केलीये. महायुती मिळून आम्ही १५१ जागा जिंकू असा विश्वास भाजपनं व्यक्त केलाय. मात्र भाजपच सर्वेक्षण याविरूद्ध सांगत असल्याचा दावा भास्कर जाधव यांनी केलाय. देवेंद्र फडणवीस यांच्या घरी त्यांच्या हजेरीत भाजपची बैठक झाली. या बैठकीत मुंबई महापालिकेसाठी १५१ चा निर्धार करत मुंबई महापालिका जिंकण्याचा विश्वास व्यक्त केलाय. दरम्यान या आधीही महापौर हा भाजपचा असेल असं वक्तव्य भाजप नेते आशिष शेलार यांनी केलं होतं. त्यावरून शिंदे गटाच्या नेत्यांनी नाराजी व्यक्त केली होती. मात्र बैठक भाजपची असली तरी मुंबई महापालिका जिंकण्यासाठी महायुती मिळून १५१ जागा जिंकू असा संकल्प केला असल्याचे संजय शिरसाट यांनी म्हटले आहे. बघा स्पेशल रिपोर्ट
Published on: Jun 05, 2023 06:56 AM
Latest Videos