‘… म्हणून पंकजा मुंडे यांच्या वैद्यनाथ साखर कारखान्याला नोटीस’, बच्चू कडू यांनी सांगितलं थेट कारण
VIDEO | भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याला केंद्रीय जीएसटी आयुक्तालयाकडून नोटीस, प्रहार आमदार बच्चू कडू यांनी केलं मोठं भाष्य अन् सांगितलं कारवाई होण्याचं कारण
अमरावती, २५ सप्टेंबर २०२३ | केंद्रीय जीएसटी आयुक्तालयाने सहा महिन्यांपूर्वी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यावर धाड टाकली होती. यानंतर या कारखान्याचे कागदपत्रेही तपासले होते. यामध्ये या कारखान्याने 19 कोटी रुपयांचा बेकायदेशीर जीएसटी कर बुडवल्याचे स्पष्ट होते. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर येथील जीएसटी आयुक्तालयाने कारखान्यास नोटीस दिली आहे. याआधीही केंद्रीय जीएसटी आयोगाच्या छत्रपती संभाजीनगर येथील आयुक्त कार्यालयाच्या पथकाने वैद्यनाथ कारखान्याला जीएसटी कराबाबत नोटीसा दिल्या होत्या. या नोटिसींना उत्तर न दिल्याने सहा महिन्यांपूर्वी काही अधिकाऱ्यांनी या कारखान्याला भेट देऊन काही कागदपत्रे ताब्यात घेतले आणि कर बुडवल्याचे स्पष्ट झाल्यानंतर कारवाई केली. दरम्यान, यावर प्रहारचे आमदार यांनी या कारवाईवर भाष्य केले आहे. बच्चू कडू म्हणाले, पंकजा मुंडे यांनी शिवशक्ती यात्रा काढली आणि त्या स्वतः महाराष्ट्रामध्ये फिरल्या त्यामुळे कारवाई सुरू झाली असावी, असे मत त्यांनी व्यक्त केलेय.