Bcchu Kadu : वाघनखांवरून राजकारण? बच्चू कडू यांचा सुधीर मुनगंटीवार यांना चिमटा; म्हणाले, ... मला ते काही आवडलं नाही

Bcchu Kadu : वाघनखांवरून राजकारण? बच्चू कडू यांचा सुधीर मुनगंटीवार यांना चिमटा; म्हणाले, … मला ते काही आवडलं नाही

| Updated on: Oct 16, 2023 | 10:30 AM

tv9 marathi Special Report | छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाघनखांवरून सुरू झालेला राजकारण काही थांबायचं नाव घेत नाही. यापूर्वी आदित्य ठाकरे यांनी सवाल उपस्थित केले त्यानंतर आता बच्चू कडू यांनी करारावर खोचक टीका, काय केली सडकून टीका, बघा स्पेशल रिपोर्ट

मुंबई, १६ ऑक्टोबर २०२३ | छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाघनखांवरून सुरू झालेला राजकारण काही थांबायचं नाव घेत नाही. यापूर्वी आदित्य ठाकरे यांनी सवाल उपस्थित केले त्यानंतर आता बच्चू कडू यांनी करारावर खोचक टीका केल्याचे पाहायला मिळाले. शिवाजी महाराज यांची वाघनखं भारतात आणण्यासाठी मंत्री सुधीर मुनगंटीवार आणि मंत्री उदय सामंत यांचा लंडन दौरा नुकताच पार पडला. पण त्यांच्याच या दौऱ्यावरून त्यांचेच सहकारी आमदार बच्चू कडू यांनी खोचक टीका केली. भारतात आणली जाणारी वाघनखं सध्या ब्रिटनच्या एका संग्रहायलात आहेत. ३ ऑक्टोबर रोजी या वाघनखांसंदर्भात करार झाला आणि मुनगंटीवारांसह सगळ्यांनी जल्लोष केला. लंडनसह जपानचा दौरा अटोपून मुनगंटीवार ११ ऑक्टोबर रोजी भारतात परतले. तेव्हा मुंबईत त्यांचं जंगी स्वागत करण्यात आले. पण ही वाघनखं कधी भारतात येणार याची निश्चित तारीख ते सांगू शकले नाही. यावरूनच बच्चू कडू यांनी निशाणा साधला.

Published on: Oct 16, 2023 10:29 AM