आमची औकात नाही, आम्ही शेपूट घालून आहोत; सभागृहात बच्चू कडू भडकले
हिवाळी अधिवेशनाचा दुसरा आठवडा सुरू आहे. दरम्यान आज सभागृहात अनेक मुद्दे गाजले. तर आमदार बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरुन सरकारला घेरल्याचे पाहायला मिळाले इतकंच नाही तर त्यांनी सरकारलाच घरचा आहेर दिला.
नागपूर, ११ डिसेंबर २०२३ : राज्य विधी मंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा दुसरा आठवडा सुरू आहे. दरम्यान आज सभागृहात अनेक मुद्दे गाजले. तर आमदार बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरुन सरकारला घेरल्याचे पाहायला मिळाले इतकंच नाही तर त्यांनी सरकारलाच घरचा आहेर दिला. शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरुन आक्रमक होत बच्चू कडू यांनी सरकारच्या योजनांवर सडकून टीका केली. तर दुसरीकडे नी सर्वपक्षीय आमदारांची चांगलीच कानउघाडणीही केली. “आम्ही कोणत्या तोंडाने बोलायचं? आम्ही पक्षाचं आहे म्हणून बोलायचं की शेतकऱ्याचं आहे म्हणून बोलायचं? आमची सरळसरळ हिंमत नाही करत. कारण तिकीट मिळत नाही. कोणत्याही पक्षाचे असूद्या”, अशा शब्दांत बच्चू कडू यांनी सर्वपक्षीय आमदारांची कानउघाडणी केली. तर तुम्ही भिकार** योजना आणताय. कोणत्या योजना काय, दोन रुपये किलो गहू द्या, अशी भिकार** योजना द्या म्हणून कोणी सांगितलं? असा सवालही त्यांनी केला.