Maratha Reservation : ... तोपर्यंत जरांगे पाटील यांनी आंदोलनावर ठाम रहावं, बच्चू कडू यांचं मोठं वक्तव्य काय?

Maratha Reservation : … तोपर्यंत जरांगे पाटील यांनी आंदोलनावर ठाम रहावं, बच्चू कडू यांचं मोठं वक्तव्य काय?

| Updated on: Jan 03, 2024 | 1:37 PM

मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषण आंदोलनाच्या नियोजनासाठी मुंबईतील मराठा समन्वयक जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटीकडे रवाना झाले आहेत. मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईतील आंदोलनाच्या नियोजनासाठी आज अंतरवाली येथे बैठक होणार आहे.

नागपूर, ३ जानेवारी २०२४ : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील हे २० जानेवारी रोजी मुंबईत धडकणार आहे. दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषण आंदोलनाच्या नियोजनासाठी मुंबईतील मराठा समन्वयक जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटीकडे रवाना झाले आहेत. मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईतील आंदोलनाच्या नियोजनासाठी आज अंतरवाली येथे बैठक होणार आहे. यावेळी मुंबईतील मराठा समन्वयक मनोज जरांगे यांच्याशी चर्चा करणार आहेत. तर जरांगे यांच्या आंदोलनासाठी आझाद मैदान मिळावं यासाठी मराठा समन्वयकांचा प्रयत्नही सुरू आहे. दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईतील आंदोलनाला आमदार बच्चू कडू यांनी पाठिंबा दर्शवला आहे. तर जोपर्यंत तोडगा निघत नाही तोपर्यंत जरांगे पाटील यांनी आंदोलनावर ठाम रहावं. मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन दोन शब्दांवर आडलंय, सरकारकडून यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न सुरू असल्याची माहितीही बच्चू कडू यांनी दिली.

Published on: Jan 03, 2024 01:37 PM