‘मला नाराज करणारा अजून जन्माला…’, महायुतीत नाराज असल्याच्या चर्चांदरम्यान बच्चू कडूंचं वक्तव्य
बच्चू कडू महायुतीत नाराज होते अशा चर्चा सुरू होत्या. या नाराजी दरम्यान, बच्चू कडू यांनी शरद पवार यांची भेट घेतली. शरद पवार यांच्या भेटीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. मी नाराज नसतो मला नाराज करणारा अजून तरी अस्तित्वात नाही, असे बच्चू कडू म्हणाले.
गेल्या दोन दिवसांपासून प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू महायुतीत नाराज असल्याच्या चर्चा सुरू आहे. या नाराजीच्या चर्चा सुरू असताना बच्चू कडू यांनी केलेल्या एका वक्तव्याने साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. मी नाराज नसतो, मला नाराज करणारा अजून जन्माला यायचाय असं वक्तव्य बच्चू कडू यांनी केलं. महायुतीत नाराजीच्या चर्चांवर सवाल केला असता बच्चू कडू यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. आज रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहे. मुख्यमंत्र्यांसोबत होणाऱ्या भेटीदरम्यान सर्व चर्चा होणार असल्याचेही बच्चू कडू म्हणाले. पुढे ते असेही म्हणाले, ‘मी नाराज नसतो, मला नाराज करणारा अजून अस्तित्वात यायचा आहे. मी नाराज नाही तर लोकं नाराज आहे. लोकांमध्ये संभ्रम आहे.’ यावेळी त्यांनी एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करतील असा विश्वासही व्यक्त केला.
Published on: Aug 13, 2024 04:16 PM
Latest Videos