नवाब मलिक अजितदादांसोबत गेल्यावर मज्जा येईल, बच्चू कडू यांचं मिश्कील भाष्य काय?
देवेंद्र फडणवीस यांच्या पत्रानंतर राजकीय वर्तुळात एकच आरोप-प्रत्यारोप सुरू आहे. अशातच आमदार बच्चू कडू यांनीदेखील फडणवीस यांच्या या पत्रावर भाष्य केले आहे. बच्चू कडू यांनी काय केलं मिश्कील वक्तव्य?
नागपूर, ८ डिसेंबर २०२३ : नवाब मलिक यांच्या संदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांना एक पत्र लिहिले आणि नवाब मलिक यांना महायुतीत समाविष्ट करुन घेण्यास विरोध केला आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या पत्रानंतर राजकीय वर्तुळात एकच आरोप-प्रत्यारोप सुरू आहे. अशातच आमदार बच्चू कडू यांनीदेखील फडणवीस यांच्या या पत्रावर भाष्य केले आहे. बच्चू कडू म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांच्या पत्रानंतर नवाब मलिक आणि अजित पवार यांची भूमिका महत्त्वाची आहे. मात्र जर उद्या नवाब मलिक म्हणाले मला अजित पवारांसोबत जायचं तर मज्जा येईल…असं मिश्कील भाष्य बच्चू कडू यांनी केलं. तर पुढे ते असेही म्हणाले की, नवाब मलिकांनी असं वक्तव्य केल्यानंतर अजित पवार यांनी विरोध केला तर खरा पिक्चर सुरू होईल असेही बच्चू कडू म्हणाले.
Published on: Dec 08, 2023 05:54 PM
Latest Videos