जरांगेंनी आंदोलन पुकारलं तर सहभागी होणार, सत्ताधारी पक्षाचा आमदार असलो म्हणून काय झालं...; बच्चू कडू काय म्हणाले?

जरांगेंनी आंदोलन पुकारलं तर सहभागी होणार, सत्ताधारी पक्षाचा आमदार असलो म्हणून काय झालं…; बच्चू कडू काय म्हणाले?

| Updated on: Dec 20, 2023 | 1:06 PM

मराठा आरक्षणासंदर्भात मनोज जरांगे पाटील यांची भूमिका सरकारकडे मांडणारे सरकारमधील आमदार आणि प्रहारचे नेते बच्चू कडू यांनी मुख्यमंत्र्यांच्या सभागृहातील मोठ्या घोषणेवर भाष्य केले आहे. बच्चू कडू म्हणाले, जरांगे पाटील २४ डिसेंबरपासून आंदोलन करणार असले तर मी सुद्धा आंदोलनात उतरेल

नागपूर, २० डिसेंबर २०२३ : मराठा आरक्षणासंदर्भात मनोज जरांगे पाटील यांची भूमिका सरकारकडे मांडणारे सरकारमधील आमदार आणि प्रहारचे नेते बच्चू कडू यांनी मुख्यमंत्र्यांच्या सभागृहातील मोठ्या घोषणेवर भाष्य केले आहे. बच्चू कडू म्हणाले, जरांगे पाटील आणि सरकारमधला लढा आहे. जरांगे पाटील समाधानी झाले तर आम्ही होऊ. जरांगे पाटील २४ डिसेंबरपासून आंदोलन करणार असले तर मी सुद्धा आंदोलनात उतरेल आणि दर आंदोलन नाही पुकारले तर जय राम कृष्ण हरी…असे बच्चू कडू यांनी म्हटले आहे. तर सत्ताधारी पक्षाचा आमदार असलो तरी मला वैयक्तिक मत असल्याचेही बच्चू कडू यांनी म्हटले आहे. तर मराठा आंदोलनाला मोठं यश आलंय, सरसकटचा विषय मार्गी लागणार असून नवीन कायदा येणार आहे. त्यानुसार मराठा आरक्षण दिलं जाणार आहे. त्यामुळे याचा अभ्यास करून जरांगे पाटील यांनी त्यांच्या आंदोलनाची दिशा ठरवली पाहिजे, असेही बच्चू कडू यांनी म्हटले आहे.

Published on: Dec 20, 2023 01:06 PM