बच्चू कडू यांचे आधी भयंकर विधान, मग मागितली माफी, म्हणाले ‘आंडू ..पांडू लोकही आमदार…’
त्याच्या ओठावर मिशी नाही, दाढी नाही. चालतो तेव्हा बाई आहे की माणूस ते सुद्धा कळत नाही, असेही लोक आमदार होतात. हिजडेसुद्धा आमदार होतात, असे वादग्रस्त वक्तव्य आमदार बच्चू कडू यांनी केले. त्यांचा हा रोख कुणाच्या दिशेने होता?
जळगाव : 17 सप्टेंबर 2023 | प्रहार जनशक्ती पक्षाच्यावतीने आयोजित शेतकरी संवाद मेळाव्यात बोलताना आमदार बच्चू कडू यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलंय. जळगावात हा मेळावा आयोजित करण्यात आला होता. मी आमदार होणार की नाही याची मला पर्वा नाही. मात्र. शेतकऱ्याची पर्वा असणारा प्रहार पक्ष आहे असे ते म्हणाले. ज्याच्या बोलण्यात दम नसतो. त्याच्या ओठावर मिशी नाही, दाढी नाही. चालतो तेव्हा बाई आहे की माणूस ते सुद्धा कळत नाही, असेही लोक आमदार होतात. हिजडेसुद्धा आमदार होतात, असे वादग्रस्त वक्तव्य आमदार बच्चू कडू यांनी केले. त्यांचा हा रोख कुणाच्या दिशेने होता हे कळताच उपस्थित कार्यकर्त्यांना हसू आवरले नाही. मात्र, आमदार बच्चू कडू यांनी लगेचच त्या शब्दाबद्दल माफीही मागितली. आंडू… पांडू लोकही आमदार होतात असा माझ्या बोलण्याचा उद्देश होता असे बच्चू कडू यांनी स्पष्ट केलं.