expansion of the cabinet : मंत्रिमंडळ विस्तारावरून बच्चू कडू यांची सरकारवर टीका; विस्तार कधी होणार याचा मुहूर्त ही सांगितला

expansion of the cabinet : मंत्रिमंडळ विस्तारावरून बच्चू कडू यांची सरकारवर टीका; विस्तार कधी होणार याचा मुहूर्त ही सांगितला

| Updated on: Jun 20, 2023 | 3:38 PM

दोन्ही सत्ताधारी पक्षातील अनेक नेते मंत्रिपदाची स्वप्न पाहात आहेत. अशात आमदार बच्चू कडू यांना यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना घरचा आहेर दिला आहे.

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्य मंत्रिमंडळाच्या चर्चा सुरू आहेत. अनेकदा मंत्रिमंडळ विस्तार होणार असे वृत्त माध्यमांत देखील झळकले. मात्र अद्याप तरी मंत्रिमंडळ विस्ताराला मुहूर्त सापडलेला नाही. दोन्ही सत्ताधारी पक्षातील अनेक नेते मंत्रिपदाची स्वप्न पाहात आहेत. अशात आमदार बच्चू कडू यांना यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना घरचा आहेर दिला आहे. त्यांनी मंत्रीमंडळ विस्तारावरून सरकारवर टीका केली आहे. त्यांनी, मंत्रीमंडळ विस्ताराला वर्षभर लागेल, असे आम्हाला वाटले नव्हते. तर या सरकारमध्ये मंत्रीमंडळ विस्ताराची क्षमता नाही आहे. त्यांनी मंत्री वाढवले नाहीत. पण काही चांगली कामं केली आहेत. त्यामुळं नाराज वैगरे काही नाही. तर आता मंत्रीमंडळ विस्तार हा 2024 नंतरच होईल असेही कडू म्हणाले.

Published on: Jun 20, 2023 03:38 PM