हा नाऱ्या… भास्कर जाधव यांचा नारायण राणेंवर हल्लाबोल; तर चोप देणार…काय दिला इशारा?
ठाकरे गटाच्या मेळाव्यात आमदार भास्कर जाधव यांनी नारायण राणेंवर सडकून टीका केली होती. नारायण राणे पदांसाठी भीक मागत फिरणार असा हल्लाबोल भास्कर जाधव यांनी केला होता. दरम्यान, नारायण राणे यांनी भास्कर जाधव यांना गंभीर इशारा दिलाय.
मुंबई, १२ फेब्रुवारी २०२४ : रत्नागिरीत झालेल्या ठाकरे गटाच्या मेळाव्यात आमदार भास्कर जाधव यांनी भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर जोरदार टीका केली होती. या टीकेनंतर नारायण राणे यांनी भास्कर जाधव यांना प्रत्युत्तर दिलंय. भास्कर जाधव यांनी जर पुन्हा विधान केलं तर चोप देणार, सोडणार नाही…असा इशाराच नारायण राणे यांनी दिलाय. ठाकरे गटाच्या मेळाव्यात आमदार भास्कर जाधव यांनी नारायण राणेंवर सडकून टीका केली होती. नारायण राणे पदांसाठी भीक मागत फिरणार असा हल्लाबोल भास्कर जाधव यांनी केला होता. दरम्यान, नारायण राणे यांनी भास्कर जाधव यांना गंभीर इशारा दिलाय. नारायण राणे यांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर ठाकरे गटाचे नेते वैभव नाईक यांनीही नारायण राणेंना प्रत्युत्तर दिलंय. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट
Published on: Feb 12, 2024 12:25 PM
Latest Videos