आमदार देवेंद्र भुयार यांनी हाकली बैलगाडी, बघा व्हिडीओ
VIDEO | आमदार देवेंद्र भुयार यांनी स्वतः शंकरपटाच्या मैदानात उतरून बैलजोडी हाकण्याचा आनंद लुटला
अमरावती : अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुक्यातील वाठोडा चांदस येथे यशवंत शंकरपट मंडळ आणि आमदार देवेंद्र भुयार मित्र परिवाराच्या वतीने शंकर पटाचे जंगी आयोजन केले होते. या जंगी आयोजनादरम्यान, शंकरपटामध्ये आमदार देवेंद्र भुयार यांनी स्वतः शंकरपटाच्या मैदानात उतरून बैलजोडी हाकलण्याचा आनंद लुटला. यावेळी त्यांनी इतर स्पर्धकाप्रमाणे भरधाव वेगाने आमदार देवेंद्र भुयार यांनी बैलजोडी हाकलली. दरम्यान, राजकीय वर्तुळातील नेते मंडळी ज्यावेळी भाषणं करतात त्यावेळी त्यांची भाषणं आणि वक्तव्य माध्यमांकडून दाखवले जातात. मात्र काही नेत्यांचे राजकीय घडामोडी व्यतिरिक्त असेही काही क्षण देखील सोशल मिडीयाच्या माध्यमातून जोरदार व्हायरल होताना दिसतात. बघा आमदार देवेंद्र भुयार यांचा बैलगाडी हाकतानाचा व्हिडीओ
Published on: Apr 03, 2023 05:48 PM
Latest Videos