Devendra Bhuyar | भाजप जातीयवादी पक्ष त्यामुळे राजू शेट्टी त्यांच्यासोबत जाणार नाही
वीजबिल सोडले तर शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतले आहेत. राजू शेट्टी यांच्या पाच तारखेला कोल्हापुरात होणाऱ्या संघटनेच्या मेळाव्याचे मला निमंत्रण नाही. राजू शेट्टी यांनी कारवाई केली तर ती मला सहन करावी लागेल. एखाद्या पक्षाशी जवळीक वाढली म्हणजे त्या पक्षात गेलो असं होत नाही, असे देवेंद्र भुयार यांनी स्पष्ट केले.
अमरावती : माझ्यात आणि राजू शेट्टी यांच्यात मतभेद हे राजकीय आणि वैचारिक असू शकतात, पण मनभेद नाही. शेतकरी चळवळीत काम करणाऱ्यांमध्ये मतभेद नाही; विचार वेगवेगळे असू शकतात. शेतकरी हितासाठी आम्ही एकत्र येतो. राजू शेट्टी आणि माझ्यात दुरावा नाही आहे. शेतकरी संघटनेच्या बाजूला गेलो असलो तरी मी चळवळीत कायम आहे. मी पूर्वी पश्चिम महाराष्ट्रात जात होतो त्यामुळे मतदारसंघात माझं दुर्लक्ष होत होतं. आपला मतदार संघ सोडून दुसऱ्या ठिकाणी जायचं नाही ही शपथ घेतली. भाजप हा जातीयवादी पक्ष आहे त्यामुळे राजू शेट्टी त्यांच्यासोबत पुन्हा जाणार नाही. राजकीय समीकरण जोडासाठी राजू शेट्टी एखाद्या निर्णय घेऊ शकतात. राजू शेट्टींनी महाविकास आघाडीपासून वेगळ व्हावे असे सध्याचे वातावरण नाही आहे. वीजबिल सोडले तर शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतले आहेत. राजू शेट्टी यांच्या पाच तारखेला कोल्हापुरात होणाऱ्या संघटनेच्या मेळाव्याचे मला निमंत्रण नाही. राजू शेट्टी यांनी कारवाई केली तर ती मला सहन करावी लागेल. एखाद्या पक्षाशी जवळीक वाढली म्हणजे त्या पक्षात गेलो असं होत नाही, असे देवेंद्र भुयार यांनी स्पष्ट केले.
Latest Videos