भाजप नेत्याचा मिटकरी यांच्यावर पलटवार; फडतूस असा उल्लेख करत म्हणाला, ‘खालच्या…’
राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी प्रत्युत्तर दिलं होतं. तसेच पवार कुटुंबावर बोलण्यासाठी सुपारी घेतलेले सुपारी बहाद्दर भाजपामध्ये आहेत. नितेश राणे असतील किंवा गोपीचंद पडळकर असतील यांच्यात कॅबिनेट मंत्रीपदासाठी स्पर्धा सुरू आहे
सोलापूर : भाजप नेते आणि आमदार गोपीचंद पडळकर यांनी ‘द केरला स्टोरी’ या हिंदी चित्रपटावरून तर लव्ह जिहाद वरून शरद पवार यांच्यावर टीका केली होती. त्यांनी शरद पवार यांच्यासह खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर देखील टीका केली होती. त्यावरून राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी प्रत्युत्तर दिलं होतं. तसेच पवार कुटुंबावर बोलण्यासाठी सुपारी घेतलेले सुपारी बहाद्दर भाजपामध्ये आहेत. नितेश राणे असतील किंवा गोपीचंद पडळकर असतील यांच्यात कॅबिनेट मंत्रीपदासाठी स्पर्धा सुरू आहे. जितकं खालच्या पातळीवर बोलता येईल तेवढं बोलण्याचा भाजपचा प्रयत्न सुरू आहे. त्याला पडळकरांनी प्रत्युत्तर दिले आहे. पडळकर यांनी अशा फडतूस लोकांकडे मी लक्ष देत नाही. तर पवार सोडून त्यांच्या खाली मी कोणाला सिरीयसली घेत नाही. आणि राहिला प्रश्न मंत्री पदाबाबत तर आमचं काम सुरू आहे. आमचा पक्ष आणि आम्ही ते पाहून घेऊ.