Gopichand Padalkar | बैलगाडा मालकांना जात-पात, धर्म, भेद, पक्ष-पार्टी काही नाही : गोपीचंद पडळकर

Gopichand Padalkar | बैलगाडा मालकांना जात-पात, धर्म, भेद, पक्ष-पार्टी काही नाही : गोपीचंद पडळकर

| Updated on: Aug 20, 2021 | 8:15 AM

ल्या तीन ते चार दिवसांपासून झरे गावात पोलिसांचा तगडा बंदोबस्त होता. झरे गावच्या पंचक्रोशीत पोलिसांचा मोठा फौजफाटा तसंच आमदार गोपीचंद पडळकर यांच्याही मागे पोलिस असतानाही पडळकर यांच्या समर्थकांनी बैलगाडा शर्यत पार पाडून दाखवली आहे. बैलगाडा शर्यत होणारच असं म्हणत पडळकरांनी पोलिस प्रशासनासमोर मोठं आव्हान उभं केलं होतं. अखेर शासन प्रशासनाला गुंगारा देत पडळकरांचा गनिमी कावा यशस्वी झाला आहे.

गेल्या तीन ते चार दिवसांपासून झरे गावात पोलिसांचा तगडा बंदोबस्त होता. झरे गावच्या पंचक्रोशीत पोलिसांचा मोठा फौजफाटा तसंच आमदार गोपीचंद पडळकर यांच्याही मागे पोलिस असतानाही पडळकर यांच्या समर्थकांनी बैलगाडा शर्यत पार पाडून दाखवली आहे. बैलगाडा शर्यत होणारच असं म्हणत पडळकरांनी पोलिस प्रशासनासमोर मोठं आव्हान उभं केलं होतं. अखेर शासन प्रशासनाला गुंगारा देत पडळकरांचा गनिमी कावा यशस्वी झाला आहे. “काही शेतकऱ्यांनी, बैलगाडा चालक मालकांनी बैलगाडा शर्यत पार पाडली असल्याचं आम्हाला प्रसारमाध्यमांतून कळत आहे. आम्ही आणखी त्या ठिकाणी गेलेलो नाही. झरे गावात मोठा पोलिस फौजफाटा होता. कायदा आणि सुवव्यस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिस प्रशासनाने आम्हाला विनंती केली होती. त्यांच्या विनंतीला मान आम्ही दिला. पण आता आम्हाला काही शेतकऱ्यांनी स्पर्धा पार पाडली आहे, अशी माहिती कळतीय”, असं पडकर म्हणाले.