Pandharpur | ओबीसी आरक्षणासाठी आमदार गोपीचंद पडळकरांचा एल्गार, पंढरपुरात घोंगडी बैठक

Pandharpur | ओबीसी आरक्षणासाठी आमदार गोपीचंद पडळकरांचा एल्गार, पंढरपुरात घोंगडी बैठक

| Updated on: Jun 15, 2021 | 7:02 PM

ओबीसी आरक्षणासाठी आमदार गोपीचंद पडळकर आक्रमक झाले आहेत. त्यांनी पंढरपुरात घोंगडी बैठक घेतली आहे.

ओबीसीचे राजकीय आरक्षण रद्द केल्यानंतर आमदार गोपीचंद पडळकरांनी एल्गार पुकारला आहे. पडळकर आरक्षणासाठी आक्रमक झाले असून त्यांनी पंढरपुरातून कार्यकर्त्यांसह घोंगडी बैठकीला सुरुवात केली.

कोरोनामुळे बिकट झालेल्या परिस्थितीबद्दल राज्यसरकार काहीच उपाययोजना करत नसल्याचा आरोप पडळकरांनी यावेळी केला. राज्य सरकारने राज्य मागासवर्ग आयोग स्थापन न केल्याने ओबीसी आरक्षणाला स्थगिती मिळाल्याचं पडळकर म्हणाले. तसेच राज्यसरकारची भूमिका ओबीसी समाजाविरोधी असल्याचा आरोपही त्यांनी केला.

 

Published on: Jun 15, 2021 04:22 PM