'आता अचानक आठवण झाली, तुम्ही मुसलमान आहात?', राष्ट्रवादीच्या नेत्याकडून कोणावर आगपाखड?

‘आता अचानक आठवण झाली, तुम्ही मुसलमान आहात?’, राष्ट्रवादीच्या नेत्याकडून कोणावर आगपाखड?

| Updated on: Sep 04, 2024 | 4:40 PM

“जयंत पाटील दोन दिवसांपूर्वी आले, त्यांनी सभा घेतली. काल पवार साहेबांनी सभा घेतली, मला समजत नाही की ते माझ्यासारख्या अल्पसंख्यांक कार्यकर्त्यांच्या मागे का लागले आहेत?” असा सवाल राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते हसन मुश्रीफ यांनी उपस्थित केला. यानंतर जितेंद्र आव्हाडांनी जोरदार निशाणा साधला

शरद पवार हे जातीपातीच्या पलीकडे जाऊन राजकारण करतात, असे वक्तव्य करत महायुतीतील नेते मुस्लीमांविरोधात बोलल्यावर निषेध का व्यक्त करत नाही? जितेंद्र आव्हाड यांनी अस म्हणत हसन मुश्रीफ यांच्यावर जोरदार घणाघात करत प्रश्नांची सरबत्ती केली आहे. तुम्हाला एवढंच जर प्रेम होतं तर परवा ट्रेनमध्ये एका म्हाताऱ्या मुसलमानाला मारण्यात आलं तेव्हा तुम्ही का नाही बोललात? देशभरात मुसलमानांना मारत आहेत गोळ्या घालत आहेत त्यावर तुम्ही का बरं बोलत नाहीत? असा सवालही जितेंद्र आव्हाड यांनी हसन मुश्रीफांना केला तर तुमच्याच युतीतले आमदार मुसलमानांना मशिदीत घुसून गोळ्या मारीन, असं म्हणतात तेव्हा तुम्ही साधा निषेधाचा शब्द सुद्धा काढलेला नाही ना तुमच्या नेतृत्वाने काढला आणि आता अचानक तुम्हाला आठवण झाली की, मी मुसलमान आहे आणि म्हणून मला विरोध होतोय, म्हणून शरद पवार माझ्या मागे लागलेत पण शरद पवार जात-पात, प्रांत यापुढे जाऊन राजकारण करतात, असे म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी हसन मुश्रीफांवर जोरदार हल्लाबोल केला.

Published on: Sep 04, 2024 04:39 PM