अरे किती कोत्या मनाचे आहात… सुनावणीनंतर जितेंद्र आव्हाड कुणावर भडकले?
आयोगाने दिलेल्या निकालाविरोधात शरद पवार गटाने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. यावर आज सुनावणी पार पडली. या सुनावणी नंतर जितेंद्र आव्हाड यांनी कोर्टाचे आभार व्यक्त केले. काय म्हणाले सुनावणीनंतर आमदार जितेंद्र आव्हाड?
नवी दिल्ली, १९ फेब्रुवारी २०२४ : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नाव आणि चिन्हाबाबत आयोगाने दिलेल्या निकालाविरोधात शरद पवार गटाने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. यावर आज सुनावणी पार पडली. या सुनावणी नंतर जितेंद्र आव्हाड यांनी कोर्टाचे आभार व्यक्त केले. ते म्हणाले, दहाव्या शेड्यूलचा धज्जा उडाला हे सुप्रीम कोर्टाच्या लक्षात आलं. त्यांच्या वकिलांशी जज युक्तिवाद करत होते. आम्हाला आनंद झाला की, लोकशाही मुल्यांचा आदर राखला पाहिजे. ते सुप्रीम कोर्टाने उचलून धरलं. मी सुप्रीम कोर्टाचा अत्यंत आभारी आहे. तर सुप्रीम कोर्ट म्हणाले की तुमचे मर्जर कुठे गेले? त्यांच्या वकीलांशी जज युक्तीवाद करत होते. मी आज सुप्रीम कोर्टाच्या जजेसचा आभारी आहे. नाव काढून घ्या हे म्हणणं किती कोत्या मनाचे आहेत, असे म्हणत आव्हाड काहीसे भडकल्याचे पाहायला मिळाले.
Published on: Feb 19, 2024 06:23 PM
Latest Videos