अयोध्येला का गेले नाही? अब्दुल सत्तार नाराज? काय म्हणाले सत्तार?
VIDEO | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अयोध्या दौऱ्यातील ताफ्यात काही आमदार आणि खासदार गैरहजर, अब्दुल सत्तार नाराज?
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अयोध्या दौऱ्यातील ताफ्यात काही आमदार आणि खासदार गैरहजर असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. दरम्यान, विरोधकांकडून कृषीमंत्री अब्दुल सत्तार, आमदार शहाजी बापू पाटील, अपक्ष आमदार बच्चू कडू आणि खासदार भावना गवळी यांच्या अयोध्येतील गैरहजेरीवरून प्रश्नचिन्ह उभं करण्यात आलं आहे. यावरून यावरून अब्दुल सत्तार यांनी स्पष्ट सांगितले की, मी नाराज नाही. रामाबद्दल माझ्या मनामध्ये एक असं तीळ मात्र शंका नाही. मी एक राम भक्तच आहे. काही ठिकाणी हे जे शेतकरी बांधवांवर संकट आलंय. पाहणीसाठी मी दौरा काढला आणि सातत्याने जालना झाला संभाजीनगर झाला त्यानंतर बीड झाला परभणीचा काही भाग मी पाहिला. आज मी दोन जिल्हे तीन जिल्हे पाहणार आहे. अकोला, बुलढाणा आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी रात्री आमच्याकडेही संभाजीनगरमध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. शेतकऱ्यांचे अश्रू पुसणं हेही रामाचंच काम आहे. त्यासाठी मी अयोध्येला गेलो नाही, असे त्यांनी स्पष्ट म्हणाले.