राज ठाकरे यांनी भरसभेत केलेला 'तो' गौप्यस्फोट खरा, नितेश राणे यांनी काय केला दावा?

राज ठाकरे यांनी भरसभेत केलेला ‘तो’ गौप्यस्फोट खरा, नितेश राणे यांनी काय केला दावा?

| Updated on: Mar 23, 2023 | 8:50 PM

VIDEO | राज ठाकरे यांनी भरसभेत बाळासाहेबांच्या 'त्या' फोनचा सांगितला किस्सा, कॉलवर मागे कुणीतरी बोलत होतं? नितेश राणे यांनी त्याचं नावचं सांगितलं

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा काल शिवतीर्थावर गुढीपाडवा मेळावा झाला या मेळाव्यात राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला राज ठाकरे यांनी केलेल्या भाषणात नारायण राणे यांनी शिवसेना का सोडली किंवा नारायण राणे शिवसेना सोडून गेलेच नसते, असा दावा केला. भरसभेत राज ठाकरे यांनी हा दावा करताना एक कॉल आल्याचे सांगितले. बाळासाहेब ठाकरे बोलत असतांना त्या कॉलवर मागे कुणीतरी बोलत होतं हे मला कळत होतं. नारायण राणे यांना पक्षात थांबू नये यासाठी तो अखेरचा कॉल असतांना मागे कोण पुटपुटत होतं यावरून जोरदार चर्चा सुरू झाली होती. त्यामध्ये उद्धव ठाकरे यांच्यापासून ते शिवसेनेतील अनेक नेत्यांची नावं घेतली जात होती. त्यावरून मात्र नितेश राणे यांनी थेट नाव घेऊनच उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला. उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्यावर दबाव टाकत नारायण राणे यांना भेटण्यासाठी रोखले. तुम्ही नारायण राणे यांना भेटले तर मुलबाळ सोबत मातोश्री सोडेल असं उद्धव ठाकरे म्हणल्याचा दावा नितेश राणे यांनी केला आहे. बघा काय म्हणाले नितेश राणे…

Published on: Mar 23, 2023 08:50 PM