राजन साळवी यांची ACB चौकशी, बोलतांना अश्रू अनावर अन् कंठ दाटला, बघा काय म्हणाले?

राजन साळवी यांची ACB चौकशी, बोलतांना अश्रू अनावर अन् कंठ दाटला, बघा काय म्हणाले?

| Updated on: Mar 04, 2023 | 6:31 PM

VIDEO | ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांच्या पाठीमागे चौकशीचा ससेमिरा, एसीबीच्या नोटिसीनंतर रत्नागिरीमधील घराचं मूल्यांकन, बघा काय मांडली भूमिका

रत्नागिरी : ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांच्या पाठीमागे चौकशीचा ससेमिरा लागलेला आहे. राजन साळवी यांची एसीबीकडून चौकशी सुरु आहे. असे असताना आज सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी त्यांच्या घरी पोहोचले. या घटनेमुळे राजन साळवी अस्वस्थ झाल्याचे पाहायला मिळाले आहे. एसीबीने दिलेल्या नोटिसीनंतर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी रत्नागिरीतील त्यांच्या घराचे मूल्यांकन केलं. यावेळी राजन साळवी यांना आपल्या भावना अनावर झाल्या आणि त्यांना अश्रू अनावर झाल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, बांधकाम विभागाकडू करण्यात आलेल्या कृतीवर बोलताना त्यांचा कंठ दाटून आला. राजन साळवी यांच्या घरी अधिकारी घराचे मूल्यांकन करण्यासाठी आले त्यावेळी ते देवपूजेला बसलेले होते. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला बघा राजन साळवी नेमकं काय म्हणाले?

Published on: Mar 04, 2023 06:31 PM