बीडचं पार्सल बीडला परत पाठवा, भाजपचा हा उमेदवार सोशल मीडियावर जोरदार ट्रोल

बीडचं पार्सल बीडला परत पाठवा, भाजपचा हा उमेदवार सोशल मीडियावर जोरदार ट्रोल

| Updated on: Mar 25, 2024 | 4:09 PM

भाजपने सोलापूरमधून राम सातपुते यांना उमेदवारी दिली आहे. यावरून सातपुते यांना ट्रोल केलं जात आहे. भाजपचे आमदार राम सातपुते यांनी ट्रोलर्सला सडेतोड उत्तर दिलं आहे.

बीडचं पार्सल बीडला पाठवा, असा मजकूर सोशल मीडियातून व्हायरल होत आहे. भाजपने सोलापूरमधून राम सातपुते यांना उमेदवारी दिली आहे. यावरून सातपुते यांना ट्रोल केलं जात आहे. भाजपचे आमदार राम सातपुते यांनी ट्रोलर्सला सडेतोड उत्तर दिलं आहे. अशा पद्धतीचं ट्रोलिंग म्हणजे पराभूत मानसिकतेचे लक्षण आहे. मी सोलापूर जिल्ह्यातला आमदार आहे. जिल्ह्यातील वेगवेगळ्या साखर कारखान्यामध्ये माझ्या आई-वडिलांनी ऊस तोडीचे काम केलं आहे. काँग्रेस नेत्या सोनिया गांधी या इटलीहून आल्या आहेत. त्या त्यांना चालल्या. मी चालत नाही का?, असा सवाल राम सातपुते यांनी केला. पुढे ते असेही म्हणाले, काँग्रेस नेते राहुल गांधी पराभवाच्या भीतीने उत्तर प्रदेशातून वायनाडला गेले. तिथून ते निवडणूक लढतात ते त्यांना चालतात. पण मी सोलापूर जिल्ह्यातील आमदार असूनही त्यांना चालत नाही. मी तर याच राज्याचा आहे, असं सांगतानाच मोठ्या मताधिक्याने भाजप जिंकेल आणि सोलापूरमध्ये भाजप विजयाची हॅट्रिक करेल असा माझा विश्वास आहे, असंही सातपुते म्हणाले.

Published on: Mar 25, 2024 04:09 PM