आमदार बोरणारेंनी मला प्रचंड मारहाण केली
आमदार रमेश बोरणारे यांच्या कौटुंबीक वाद आता विकोपाला गेला आहे. ज्या महिलेन आमदार बोरणारे यांच्यावर विनयभंगाचा आरोप केला आहे.
आमदार रमेश बोरणारे यांच्या कौटुंबीक वाद आता विकोपाला गेला आहे. ज्या महिलेन आमदार बोरणारे यांच्यावर विनयभंगाचा आरोप केला आहे. त्यांनी सांगितले की, एका घटनेवरुन आपल्याला व पतीला बोलण्यासाठी म्हणून बोलवून घेतले पण त्यावेळी बोरणारे यांच्या बरोबर आलेले त्यांचे भाऊ आणि काही साथीदार यांनी आपल्याला बेदम मारहाण केली. ही मारहाण इतकी करण्यात आली की, अंगावरील कपडे फाटले. त्यामुळे त्यांच्यावर आपण विनयभंगाचा गुन्हा दाखल केला असल्याचे सांगितले. याआधी आमदार बोरणारे यांनीही आरोप करणाऱ्या महिलेवर सासूचे छळ केला असल्याचेही टीका केली आहे. याविषयी बोलताना आरोप करणाऱ्या महिलेने सांगितले की, हे सगळं खोटं असून आम्ही सासू बरोबर चांगले आहोत असे सांगितले.
Published on: Mar 23, 2022 12:03 AM
Latest Videos