Ratnakar Gutte : आरक्षणाच्या मागणीसाठी आमदार रत्नाकर गुट्टे यांचं अन्नत्याग आंदोलन
Maratha and Dhangar reservation : मराठा आणि धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी आमदार रत्नाकर गुट्टे यांनी एकदिवसीय अन्नत्याग आंदोलन केले आहे. राजकारण्यांना गावात प्रवेश बंदी असल्याने आमदार गुट्टे यांनी राहत्या घरी परभणीतील गंगाखेड येथे एक दिवसीय अन्नत्याग केले आहे.
परभणी, ३१ ऑक्टोबर २०२३ | गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणावरून राज्यातील वातावरण चांगलंच तापलं आहे. सामान्य नागरिकांप्रमाणे आता राजकीय नेते देखील आरक्षणात रस्त्यावर उतरत आहे. मराठा समाज आणि धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी गंगाखेडचे आमदार रत्नाकर गुट्टे यांनी परभणीच्या गंगाखेड येथे एक दिवसीय अन्नत्याग आंदोलन केले आहे. राजकारण्यांना गावात प्रवेश बंदी असल्याने आमदार गुट्टे यांनी राहत्या घरी एक दिवसीय अन्नत्याग केल्याचे पाहायला मिळत आहे. आमदार रत्नाकर गुट्टे यांना स्थानिक कार्यकर्त्यांनी देखील पाठिंबा दिला आहे. दरम्यान, मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळातून देखील राजीनामे दिले जात आहे. मनोज जरांगे पाटील यांनी आमदारांना राजीनामा न देण्याचे आवाहनही केले होते. मात्र तरीही आमदारांच्या राजीनाम्याची मालिका सुरूच आहे.
Published on: Oct 31, 2023 11:20 AM
Latest Videos