राजकीय वर्तुळात खळबळ! तिघांचे घ्या आणि चौथ्याला मतदान करा आमदाराचं वक्तव्य

राजकीय वर्तुळात खळबळ! “तिघांचे घ्या आणि चौथ्याला मतदान करा” आमदाराचं वक्तव्य

| Updated on: Aug 04, 2022 | 12:09 PM

एवढंच नव्हे तर खर्च करणाऱ्या उमेदवारांनी हे पैसे काही मेहनतीने कमावलेले नसतात तर ते जनतेलाच लुटलेलं असतं असंही आमदार म्हणाले. परभणीच्या राजकीय (Politics) वर्तुळात सध्या या वक्तव्यानं खळबळ माजली आहे.

परभणीः परभणीतल्या राष्ट्रीय समाज पक्षाचे आमदार रत्नाकर गुट्टेंच्या (MLA Ratnakar Gutte) एका वक्तव्यामुळे चांगलीच खळबळ माजली आहे. आगामी जिल्हा परिषद निवडणुकांच्या (Parbhani ZP Election) पार्श्वभूमीवर स्थानिक राजकारणात मोठ्या घडामोडी होत आहेत. विविध कार्यकर्त्यांचे पक्षप्रवेश सुरु आहेत. अशाच एका कार्यक्रमात आमदार रत्नाकर गुट्टे यांनी खळबळजनक वक्तव्य केल्याचं समोर आलं आहे. यंदाच्या निवडणुकीत समजा चार उमेदवार असतील तर तिघांचे (पैसे) घ्या आणि चौथ्याला मतदान करा, असं वक्तव्य त्यांनी केलं. एवढंच नव्हे तर खर्च करणाऱ्या उमेदवारांनी हे पैसे काही मेहनतीने कमावलेले नसतात तर ते जनतेलाच लुटलेलं असतं असंही आमदार म्हणाले. परभणीच्या राजकीय (Politics) वर्तुळात सध्या या वक्तव्यानं खळबळ माजली आहे.

 

 

Published on: Aug 04, 2022 12:09 PM