विजय वडेट्टीवार लोकसभा निवडणुकीनंतर भाजपात जाणार, कुणी केला मोठा दावा?

विजय वडेट्टीवार लोकसभा निवडणुकीनंतर भाजपात जाणार, कुणी केला मोठा दावा?

| Updated on: Apr 08, 2024 | 1:37 PM

'विजय वडेट्टीवार हे भाजपच्या संपर्कात होते आणि आताही आहेत. लोकसभा संपल्यानंतर वडेट्टीवार भाजपमध्ये दिसतील. आता वडेट्टीवार जे वक्तव्य करत आहेत ती काँग्रेसच्या लोकांची दिशाभूल आहे. विजय वडेट्टीवार यांनी त्यांचा इतिहास जरा उघडून बघावा ते कुठून आले कुठे गेले?'

विजय वडेट्टीवार हे लोकसभा निवडणूक झाल्यावर ते स्वतः भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचा मोठा दावा आमरावतीतील आमदार रवी राणा यांनी केला आहे. विजय वडेट्टीवार यांचा भाजपमध्ये जाण्याचा निर्णय झालेला आहे, असेही रवी राणा यांनी म्हटलंय. विजय वडेट्टीवार हे भाजपच्या संपर्कात होते आणि आताही आहेत. लोकसभा संपल्यानंतर वडेट्टीवार भाजपमध्ये दिसतील. आता वडेट्टीवार जे वक्तव्य करत आहेत ती काँग्रेसच्या लोकांची दिशाभूल आहे. विजय वडेट्टीवार यांनी त्यांचा इतिहास जरा उघडून बघावा ते कुठून आले कुठे गेले? असा सवाल करत रवी राणा यांनी विजय वडेट्टीवार यांना खोचक सवाल केला आहे. भाजपमध्ये आल्यास विजय वडेट्टीवार यांचं स्वागतच आहे. आता जास्त काही बोलणार नाही, लवकरच चित्र स्पष्ट होईल, असे म्हणत आम्ही कुठल्याही दिशेने राहो जनता आमच्या सोबत राहते, असा विश्वासही रवी राणा यांनी व्यक्त केला आहे.

Published on: Apr 08, 2024 01:37 PM