Ravi Rana | अनिल परब यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करा, आमदार रवी राणा यांची मागणी

Ravi Rana | अनिल परब यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करा, आमदार रवी राणा यांची मागणी

| Updated on: Nov 07, 2021 | 6:28 PM

रवी राणा यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर जोरदार टीका केलीय. राज्य सरकार एसटी कर्मचाऱ्यांची थट्टा करत असल्याचा आरोप त्यांनी केलाय. अनेक एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यामुळे अनिल परब यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी राणा यांनी केलीय.

राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप अजूनही सुरुच आहे. एसटी महामंडळाचं सरकारमध्ये विलिनीकरण करण्यात यावं यासह अन्य मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरु आहे. अमरावती जिल्ह्यातही एसटी कर्मचाऱ्यांकडून कडकडीत बंद पाळला जातोय. अमरावती विभागीय कार्यालयासमोर एसटी कर्मचाऱ्यांचं ठिय्या आंदोलन सुरू आहे. या आंदोलकांना आज बडनेराचे आमदार रवी राणा यांनी भेट दिली. एसटी कर्मचाऱ्यांच्या समस्या जाणून घेत त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केलाय. यावेळी रवी राणा यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर जोरदार टीका केलीय. राज्य सरकार एसटी कर्मचाऱ्यांची थट्टा करत असल्याचा आरोप त्यांनी केलाय. अनेक एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यामुळे अनिल परब यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी राणा यांनी केलीय.