तर बारामती लोकसभेसाठी उभं राहावं, रोहित पवार यांचे राम शिंदे यांना थेट आव्हान

तर बारामती लोकसभेसाठी उभं राहावं, रोहित पवार यांचे राम शिंदे यांना थेट आव्हान

| Updated on: Jan 17, 2023 | 10:13 AM

माजी मंत्री आमदार राम शिंदे यांच्या बारामती दौऱ्यावरून आमदार रोहित पवार यांनी टोला लगावला आहे. राम शिंदे यांनी बारामती लोकसभेसाठी उभं राहावं, असं म्हणत एका वाक्यात रोहित पवार यांनी राम शिंदे यांना थेट आव्हान दिलं आहे.

माजी मंत्री आमदार राम शिंदे यांच्या बारामती दौऱ्यावरून आमदार रोहित पवार यांनी टोला लगावला आहे. आमदार राम शिंदे यांनी बारामती लोकसभेसाठी उभं राहावं, असं म्हणत एका वाक्यात रोहित पवार यांनी राम शिंदे यांना थेट आव्हान दिलं आहे. एवढा आत्मविश्वास असेल तर त्यांनी उभं राहून दाखवावं, असं रोहित पवार यांनी अहमदनगर येथे माध्यमांशी बोलताना म्हटले आहे.

यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दावोस दौऱ्यावरून रोहित पवार यांनी टीका केली आहे. मुख्यमंत्री दावोसला गेले आहे, त्यामुळे अपेक्षा करूया की जे प्रकल्प निवडणुकांसाठी गुजरातला गेले आहे ते महाराष्ट्रात येतील, असा टोला त्यांनी लगावला आहे.

Published on: Jan 17, 2023 10:13 AM