Rohit Pawar News : आजच्या अर्थसंकल्पात शेतकरी कर्जमाफीची घोषणा करा – रोहित पवार
Rohit Pawar On Budget 2025 : आज राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार आहे. त्यापूर्वी आमदार रोहित पवार यांनी सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफीची घोषणा करावी अशी मागणी केली आहे.
आजपासून शेतकऱ्यांची कर्जमाफी करत असल्याची घोषणा आज अर्थसंकल्पात सरकारने करावी अशी मागणी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केली आहे. तसंच या महिन्यापासूनच लाडक्या बहिणींना 2100 रुपयांची अपेक्षा आहे, असंही त्यांनी म्हंटलं आहे. आजच्या अर्थसंकल्पात सुरुवातीलाच आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करतोय, आणि आत्तापासून करतो आहे, अशी घोषणा सरकारने करावी. महिलच्या बाबतीत जर लाडकी बहीण योजनेला तुम्ही 1500 रुपये देता. निवडणूक काळात ते पैसे तुम्ही अॅडव्हान्समध्ये दिले. आता तुम्ही 2100 रुपये देणार नसल्याचं म्हणता. मात्र 2100 रुपये तुम्ही या महिन्यापासूनच तुम्ही लाडक्या बहिणींना दिले पाहिजे, असं रोहित पवार म्हणाले.
Published on: Mar 10, 2025 12:15 PM
Latest Videos