Rohit Pawar यांचं प्रफुल्ल पटेल यांना पक्ष आणि चिन्हावरील वक्तव्यावर प्रत्युत्तर, म्हणाले, 'यावरूनच समजून घ्या की...'

Rohit Pawar यांचं प्रफुल्ल पटेल यांना पक्ष आणि चिन्हावरील वक्तव्यावर प्रत्युत्तर, म्हणाले, ‘यावरूनच समजून घ्या की…’

| Updated on: Sep 04, 2023 | 9:27 AM

VIDEO | राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह याबाबत निवडणूक आयोगाच्या कोर्टात असलेल्या प्रकरणावर प्रफुल्ल पटेल यांनी केलेल्या वक्तव्यावर आमदार रोहित पवार यांनी दिलं प्रत्युत्तर, बघा नेमकं काय म्हणाले?

जळगाव, ४ सप्टेंबर २०२३ | राष्ट्रवादी पक्ष व चिन्ह याबाबत निवडणूक आयोगाच्या कोर्टात असलेल्या प्रकरणावर प्रफुल्ल पटेल यांनी केलेल्या वक्तव्यावर आमदार रोहित पवारांनी प्रत्युत्तर दिलं आहे. चिन्ह असलं काय आणि नसलं काय आमच्याकडे पवार साहेब आहेत, तुमच्याकडे जे चिन्ह आहे ते तुम्ही ठेवा मात्र अख्खा महाराष्ट्र हा शरद पवार साहेबासोबत राहून लढणार आहे, विचारासाठी लढणार नाही. स्वार्थी राजकारण आम्हाला जमत नाही असे टीकास्त्र आमदार रोहित पवार यांनी प्रफुल्ल पटेल यांच्यावर सोडले आहे. जळगावातील खेडी येथील आयोजित मेळाव्यानंतर आमदार रोहित पवार पत्रकारांशी बोलत होते. पुढे ते असेही म्हणाले,  1999 मध्ये जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस अपक्ष स्थापन झाला त्यावेळी लोकांनी घड्याळाकडे बघितलं नव्हतं तर शरद पवार साहेबांकडे बघितलं होतं, असे म्हणत चिन्ह असल काय आणि नसल काय शरद पवार साहेब आमच्यासोबत आहेत, असे आव्हान आमदार रोहित पवार यांनी प्रफुल्ल पटेल यांना दिले आहे. आम्ही म्हणत होतो भाजपच्या नेत्यांमध्ये अहंकार आहे …दोन महिने लागले यांच्यामध्ये अहंकार यायला.. भाजपचे नेते यांना सांगतात.. निवडणूक आयोग आपलंच ऐकत.. मगच हा अहंकार प्रफुल्ल पटेल यांच्यामध्ये आलेला दिसतोय.. निवडणूक आयोगाच्या आधीच हे निर्णय देता येते यावरूनच समजून घ्या की निवडणूक आयोग भाजपाचे कदाचित ऐकतय, असा आरोपही आमदार रोहित पवारांनी केला आहे.

Published on: Sep 04, 2023 09:24 AM