Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

'पडळकरांना मंत्री करा पण मला राज्यपाल तरी करा, नाहीतर आमची आवस्था...', सदाभाऊ काय म्हणाले की सगळेच पोट धरून हसले

‘पडळकरांना मंत्री करा पण मला राज्यपाल तरी करा, नाहीतर आमची आवस्था…’, सदाभाऊ काय म्हणाले की सगळेच पोट धरून हसले

| Updated on: Apr 02, 2025 | 4:21 PM

सांगली जिल्ह्याच्या विटा येथील एका कार्यक्रमात बोलत असताना आमदार सदाभाऊ खोत यांनी महायुती सरकारमधील होणारी घुसमट बोलून दाखवली. बघा काय म्हणाले सदाभाऊ खोत?

दुष्काळग्रस्त भागात, शेतीला पाणी मिळालं पाहिजे, यासाठी कोणी संघर्ष केला असेल तर तो गोपीचंद पडळकर यांनी केला असल्याचे सदाभाऊ खोत यांनी जाहीरपणे म्हटले. पुढे त्यांनी असेही म्हटले की, योद्धा जर रणांगणात हारत नसेल तर त्याला बदमान करण्याचं षडयंत्र हे प्रस्थापितांनी केलंय पण विस्तापितांचा अंगार कोणी असेल तर तो गोपीचंद पडकर असल्याचे म्हणत खोतांनी स्तुतीसुमनं उधळली. कोणीही कितीही देव पाण्यात ठेवू दे देवा भाऊ एक दिवस गोपीचंद पडळकर यांना मंत्री करणार मात्र मला कुठं तरी राज्यपाल तरी करा, नाही तर आपली अवस्था बंद बॅड वाल्यासारखं होईल, असं मिश्कील भाष्य करत आमदार सदाभाऊ खोत यांनी महायुती सरकारमधील होणारी घुसमट व्यक्त केली आहे. सांगली जिल्ह्याच्या विटा येथे सदाभाऊ खोत बोलत होते. आमदार गोपीचंद पडळकरांचा विटा येथे नागरी सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यामध्ये बोलताना आमदार सदाभाऊ खोत यांनी माजी आमदार पृथ्वीराज देशमुख हे खासदार आणि गोपीचंद पडळकर हे मंत्री होतील, असे सांगत आपल्याला किमान राज्यपाल तरी करा अशी मिश्कील भावना व्यक्त केली. त्यामुळे व्यासपीठावर आणि सभागृहात एकच हास्यकल्लोळ झाला.

Published on: Apr 02, 2025 04:21 PM