कार्यक्रमात आमदार Sandeep Kshirsagar यांची डायलॉगबाजी, व्हिडिओ व्हायरल

| Updated on: Feb 13, 2022 | 7:48 PM

थेट पुष्पासारखी डायलॉगबाजी करून चाहत्यांना खूष केलेच. सोबतच व्यासपीठावरील मान्यवरांनीही टाळ्यांच्या कडकडात त्यांचे स्वागत केले. यावेळी क्षीरसागरांनी एका दगडात अनेक पक्षी मारले. त्यांनी आपल्या विरोधकांना योग्य तो संदेश दिलाच, सोबत आपण कसे आहोत, हे फक्त एका वाक्यात सांगून टाकले.

बीडः अल्लू अर्जूनच्या पुष्पा सिनेमाने भल्या-भल्यांना वेड लावले. त्याच्याच पंगतीत आता मराठवाड्यातल्या बीड जिल्ह्यातले राष्ट्रवादी (NCP) काँग्रेसचे आमदार (MLA) संदीप क्षीरसागरही (Sandeep Kshirsagar) सहभागी झालेत. त्यांनी नुकताच पुष्पा सिनेमा पाहिला. त्यातले अल्लू अर्जूनचे डायलॉग आणि सिनेमाही त्यांना तुफान आवडला. मग काय, एका राजकीय सभेत त्यांचा आगळावेगळा अंदाज त्यांच्या कार्यकर्त्यांना पाहायला मिळाला. त्यांनीही थेट पुष्पासारखी डायलॉगबाजी करून चाहत्यांना खूष केलेच. सोबतच व्यासपीठावरील मान्यवरांनीही टाळ्यांच्या कडकडात त्यांचे स्वागत केले. यावेळी क्षीरसागरांनी एका दगडात अनेक पक्षी मारले. त्यांनी आपल्या विरोधकांना योग्य तो संदेश दिलाच, सोबत आपण कसे आहोत, हे फक्त एका वाक्यात सांगून टाकले. तुम्हीही हा व्हिडिओ, डागलॉग आणि त्यांचा हटके अंदाज काय आहे ते जाणून घ्या.